नेहेमीच काय कामात राहायचे
सारखे स्वतःला गुंतवून घ्यायचे!
कधीतरी निवांत बसावे
स्वतःतच हरवून जावे
आपल्याशीच गप्पा माराव्यात
नाहीतर स्वतःशीच हळूच हसावे!
कधीतरी एकटे असावे
चांदणे निरखीत बसावे
चांदण्या रात्री दिसणार्या चंद्रात
न दिसणारा चेहरा शोधत राहवे!
कधीतरी शांत संध्याकाळी
सूर्य पाहत मावळतीचा
वर्षानुवर्षे सजील्या धरतीची
विरहवेदना समजून घ्यावी!
कधीतरी कुठेतरी हरवून जावे
बहरलेल्या रानात फिरायला जावे
फांदीवरचे एकले पाखरू
दिसताच दूसरे शोधत रहावे!
कधीतरी बागेत जावे
फुले बघत हरखून जावे
फुलपाखरांबरोबर धावताना
नकळत आपल्या बालपणात जावे!
सारखे स्वतःला गुंतवून घ्यायचे!
कधीतरी निवांत बसावे
स्वतःतच हरवून जावे
आपल्याशीच गप्पा माराव्यात
नाहीतर स्वतःशीच हळूच हसावे!
कधीतरी एकटे असावे
चांदणे निरखीत बसावे
चांदण्या रात्री दिसणार्या चंद्रात
न दिसणारा चेहरा शोधत राहवे!
कधीतरी शांत संध्याकाळी
सूर्य पाहत मावळतीचा
वर्षानुवर्षे सजील्या धरतीची
विरहवेदना समजून घ्यावी!
कधीतरी कुठेतरी हरवून जावे
बहरलेल्या रानात फिरायला जावे
फांदीवरचे एकले पाखरू
दिसताच दूसरे शोधत रहावे!
कधीतरी बागेत जावे
फुले बघत हरखून जावे
फुलपाखरांबरोबर धावताना
नकळत आपल्या बालपणात जावे!
- कशिदाकार
No comments:
Post a Comment